• Farmrise logo

    बायर फार्मराईज अ‍ॅप इंस्टॉल करा

    तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!

    अ‍ॅप इंस्टॉल करा
हॅलो बायर
सिंचन सुविधा: प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना
सिंचन सुविधा: प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना
ही योजना पहिल्या “Department of Agriculture, cooperation & Farmer welfare” वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आणि अधिक माहितीसाठी, आपण “Department of Agriculture, cooperation & Farmer welfare” वेबसाइटवर भेट देऊ शकता. वर्णन : शेतकऱ्यांना सिंचनाची उपकरणे खरेदी करण्यासाठी त्यांच्या भूधारणेवर आधारित आर्थिक सहाय्य (खरेदीनंतर) प्रदान केले जाते. पात्रता : अर्जदार हा जमिनीचा मालक असावा. अर्जदाराकडे सिंचनाची साधनसंपत्ती असावी. (उदा. बंधारा, विहीर, कालवा) अर्जदारास गेल्या 10 वर्षांमध्ये ह्या सेवेसाठी लाभ मिळालेले नसावे. प्रक्रिया : या योजनेद्वारे ठिबक सिंचन (अंतर्गत, बहिर्गत, उपपृष्ठभाग आणि मायक्रो जेट) आणि तुषार सिंचनाशी (मायक्रो स्प्रिंकलर, मिनि स्प्रिंकलर, मुव्हेबल स्प्रिंकलर आणि मिस्टर) संबंधित उपकरणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी नंतर अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. १. अर्जदाराने ‘इ-ठिबक’ (खाली लिंक दिली आहे) वर नोंदणी करावी. २. त्यानंतर अर्जदाराने तालुका कृषी अधिका-याशी चर्चा करून, परवानगी फॉर्म सादर करावा. जो तुम्हाला तालुका कृषी कार्यालयात मिळेल. ३. त्यांनी मंजुरी दिल्यावर, शेतकऱ्याने प्रथम वरील सिंचन उपकरणे खरेदी करावी. ४. खरेदीची कागदपत्रे घेऊन त्याना अंतिम अर्ज करावा लागेल. ज्याची प्रत देखील कृषी कार्यालयातून घ्यावी. ५.. लाभ मिळण्यासाठी अर्जदाराने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अंतीम फॉर्म सादर करावा आणि त्यानंतर त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपात लाभ मिळेल. *अर्जाबरोबर Water Resource Department अथवा महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या कार्यालयातून, अर्जदाराकडे सिंचन सुविधा आहेत असे प्रमाणपत्र द्यावे लागेल. कृपया अर्ज करण्याआधी ते मिळवा. लाभ : 50-60% of the cost
Some more Government Schemes
तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या नवीनतम सरकारी योजना आणि लाभांबद्दल अद्ययावत रहा.
Government Scheme Image
Some more Government Schemes
अटल पेन्शन योजना
Government Scheme Image
Some more Government Schemes
किसान क्रेडिट कार्ड
Government Scheme Image
Some more Government Schemes
किसान आयडी / शेतकरी आयडी: त्याचे महत्त्व आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

आमचे मोबाईल अँप डाउनलोड करा

जाता-जाता शेत: आमच्या अँपसह, कधीही, कुठेही खरोखर-वेळ मार्केट डेटामध्ये प्रवेश करा. तुमच्या भाषेतही उपलब्ध.
Google Play Image
मदतीची गरज आहे का?
तुमच्या सर्व शंका निरसनासाठी आमच्या हॅलो बायर समर्थनाशी संपर्क साधा
Bayer Logo
टोल फ्री मदत केंद्र
1800-120-4049
मुख पृष्ठमंडईउत्पादने